Breaking News

मुलांच्या कलेला वाव द्या - महापौर

पुणे, दि. 25 - आपल्या मुलांची कला बहरावी, यासाठी पालकांनी स्वतःहून पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यातील उपजत कला समजून घेत तिला वेगवेगळ्या माध्यमातून पुढे जाऊ द्यायला हवे,’’ अशी अपेक्षा महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली. 
चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय, शिव स्फूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कलाविश्‍व’ या चौथ्या राज्यस्तरीय कलाप्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. विविध गटांतील कला स्पर्धांचे पारितोषिक वितरणही या वेळी करण्यात आले. अभिनेता सुयश टिळक, उमेश गुप्ते, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, प्रज्ञेश मोळक, शशांक गुप्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सुयशने उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
रिऍलिटी शो संस्कृतीविषयी सुयश म्हणाला, रिऍलिटी शो’ हे अनेकदा प्रेक्षकांची दिशाभूल करतात. त्यातील अनेक खाचखळगे आपल्याला चटकन लक्षात येत नाहीत. हे शो टीआरपीसाठी केले जात असून त्यामागे जात स्वतःची दिशाभूल होऊ देऊ नका.’’