खडकवासला धरणात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
पुणे, दि. 25 - मित्रांसमवेत खडकवासला धरणात पोहण्यास गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे वारजे खानवस्ती येथे राहणारे आहेत.
फिरोज ताजुद्दीन नदाफ (वय 19) व वाजिद हुजूरअली सय्यद (वय 18) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. फिरोज हा बारावीत शिकत आहे. त्याचे वडीलांचा कपडे शिवून देण्याचा व्यवसाय करतात. तर वाजिद दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याचे वडील वारजे परिसरात टेम्पो चालक आहेत. दोन्ही कुटुंब मुळचे कर्नाटक राज्यातील आहेत.
या दोघांसह चार- पाचजण दुपारी साडेतीन वाजता दोन तीन दुचाकीवरुन धरणावर गेले होते. धरणावर गेल्यानंतर खडकवासला गावच्या जीवनसाधना या पाणी पुरवठा केंद्र आणि रुद्र हॉटेल जवळून ते धरणाच्या पाण्यात उतरले होते. कालव्यातून पाणी सोडायचे असल्याने खडकवासला धरणात सुमारे 84 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे, रस्त्यावरुन खाली उतरले की थेट पाण्यातच माणूस जातो.
यातील सर्वांना पोहता येत नव्हते. तसेच, दुपारच्या उकाड्यामुळे गरम होत असल्याने ते पाणी दोन तीन फुट पाण्यात गेले होते. त्यातील एक जण आणखी पुढे गेला. त्याचा पाय गाळात अडकल्याने पाण्यात जाऊ लागला. त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांनी हातांची सर्वांनी साखळी केली. पाण्यात ओढू लागल्याने तिघेजण पाण्यात जात होते. यावेळी तेथे असलेल्या एका माणसाने तिघांना ओढले परंतू एक जणाला लगेच बाहेर काढले. त्यानंतर अन्य दोघांना देखील बाहेर काढले. ही घटना सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.
स्थानिक नागरिकांनी त्यांना रिक्षातून खडकवासला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतू तेथून त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यांनी मग त्यांना नर्हे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांनी त्यांनी ससून रुग्णालयात नेले.
पोलिस बंदोबस्त नाही
खडकवासला धरण परिसरात उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने दररोज आणि सुट्ट्यांच्या दिवशी दुपारी तीन नंतर गर्दी होती. चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी होत असते. परंतू ती काढण्यासाठी किंवा पाण्यात उतरण्यास मज्जाव करण्यासाठी कोणताही बंदोबस्त दिसून आला नाही. या ठिकाणी तीन पोलिस खडकवासला धरण चौकात वाहन तपासणी करीत होते.