Breaking News

उज्ज्वल नांदेडचे यश प्रेरणादायी - प्रा. कपिल हांडे

नांदेड दि. 7 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणारे प्रयत्न व याद्वारे मिळत असलेले यश पाहून उज्ज्वल नांदेड मोहिम ही इतर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील विषयतज्ज्ञ प्रा.कपिल हांडे  यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.
विविध स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटील तर प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी  अंकूश पिनाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, शैलेश झरकर यांची उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, मार्गदर्शन शिबीर, सराव परीक्षा व अभिरुप मुलाखत याद्वारे सक्षम करण्यात येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी श्री. पिनाटे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले. प्रमुख व्याख्याते प्रा. हांडे यांनी मराठी व्याकरण, परीक्षाभिमुख कायदे व उत्पादन शुल्क विभागाच्या पूर्व परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उज्ज्वल नांदेड मोहिमेतंर्गत राबविण्यात आलेल्या मार्गदर्शन तथा प्रतिरुप मुलाखत यात सहभागी होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यामध्ये दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग दंडधिकारी पदी निवड झालेले अ‍ॅड. इरफान खान व अ‍ॅड. सरवरी कदीर अहेमद, सहाय्यक निबंधक तथा विक्रीकर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया डांगे, अधिव्याख्यातापदी  निवड झालेले श्रीमती करुणा आवरगंड, राजेश गोरे, लिंगूराम राजुरे श्रीमती आशाताई लोहटे, राजाराम टकले, सिध्देश्‍वर कांबळे, शिवाजी साखरे, श्रीमती सुधाताई मेश्राम, श्रीमती शितल शिदे, चंद्रकांत धुमाळ, प्रकाश सिरसे तसेच विक्रीकर सहाय्यक पदी निवड झालेले अमोल बालाजी पाकलवाड, अनिता सोनाजी भालेराव, गणेश तुळशीराम सर्जे, सय्यद जुबेर रहेमतुल्ला शिवकुमार सोनवळे, संजय इसानकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यात्याचे स्वागत ग्रामगिता देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे तर सुत्रसंचलन आरती कोकुलवार यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी प्रताप सुर्यवंशी, अजय वट्टमवार, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्मण शन्नेवाड, अभिजीत पवार, सोपान यनगुलवाड आदीने संयोजन केले.