बेकायदा निनावी प्रचार पत्रके वाटणार्ऐयांवर गुन्हा दाखल करा-काँग्रेस
लातूर (प्रतिनिधी), दि. 07 - निनावी तसेच प्रकाशकाचे नाव नसणारी प्रचार पत्रके मंगळवार दिनांक 04 एप्रिल रोजी वर्तमानपत्रातून वितरीत करण्यात आली आहेत. या प्रचारपत्रकातून भारतीय राष्ट्रीय काँग्रस पक्ष व लातूर महानगर पालिकेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे बेकायदा निनावी प्रचारपत्रके वाटणाऐर्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य निवडणुक आयोगाने लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. ही निवडणूक शांततेच्या वातावरणात व्हावी, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी, अशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे. मात्र निवडणुक कालावधीत गैरप्रकार घडवून आणून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न काहीं मंडळीकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बेकायदा निनावी प्रचारपत्रकांचे वितरण केले जात आहे.
लातूर शहरातील घरोघरी जाणार्ऐया वृत्तपत्रातून मंगळवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व लातूर महानगरपालिकेची बदनामी करणारे निनावी प्रचारपत्रके (हँन्डबील्स) वितरीत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या निनावी प्रचारपत्रकावर प्रकाशकाचे नाव आणि आचारसंहितेला आवश्यक असणारा अन्य मजकुर छापण्यात आलेला नाही. तो मुद्दाम टाळण्यात आला आहे. बेकायदा निनावी प्रचार पत्रकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व लातूर महानगर पालिकेची बदनामी करणाऐर्या मथळ्याखाली मजकुर लिहून मतदारांची दिशाभूल करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेला आहे. या बाबीची गंभीर दखल घेवून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे राज्य निवडणुक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी नमुद केले आहे.