सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील झुणका-भाकरी केंद्र अखेर उध्वस्त
सातारा बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र महिलांच्या गटाला भाडेतत्वावर चालवण्यास दिले होते. त्यानंतर या केंद्राविषयी बसस्थानक प्रशासन आणि महिला गट यांच्यात मालकी हक्काावरून वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी बसस्थानक प्रशासनाने सातारा येथील न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने बसस्थानक प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालानंतर पोलीस बंदोबस्तात बसस्थानक प्रशासनाने झुणका भाकर केंद्राचा ताबा घेतला. यावेळी पोलीस आणि आंदोलन करणार्या महिलांमध्ये बाचाबाची होवून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दिवसापासून महिलांनी केंद्रासमोर मंडप टाकून ठ्ठिया मांडला होता. तरीही बसस्थानक प्रशासनाने झुणका भाकर केंद्राच्या इमारतीवर अखेर जमिनदोस्त केली.