कृष्णा कारखान्याच्या विस्तारीकरणास चालना देणार : डॉ. भोसले
रेठरे बुद्रुक, दि. 20 (प्रतिनिधी) - अनेक वर्षाची जुनी मशीनरी असतानाही कृष्णा कारखान्याने यावर्षी चांगले उत्पादन घेतले आहे. येत्या काळात शेतकरी हितासाठी व उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या विस्तारीकरणास चालना देणार असल्याचे सूतोवाच कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सध्याच्या सहविज प्रकल्पाच्या अनुषंगाने उर्जाबचत व साखर मशीनरी संतुलनीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, दिलीपराव पाटील, पै. शिवाजीराव जाधव, संजय पाटील, गिरीष पाटील, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, मनोज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, पिनू जाधव, प्रमोद पाटील, जयवंत शुगर्सचे संचालक राहुल पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के कापूरकर, प्रभारी कार्यकारी संचालक मुकेश पवार आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याची मशीनरी ही खूप जूनी आहे. अगदी एक दोन कारखान्यांकडे एवढी जुनी मशीनरी असेल. परंतू या हंगामात अशी मशीनरी असूनही कारखान्याच्या कामगारांनी व अधिकारी वर्गाने कारखाना उत्कृष्ठरित्या चालवला. यावर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक अॅडव्हान्स कृष्णेचा आहे. भविष्यात ही मशिनरी बदलण्याबरोबरच कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुकेश पवार यांनी प्रास्ताविक केले. लिंबाजीराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.