एकवीरा चौक ते गावडे मळ्यातील रस्त्यामुळे विकासाला चालना
अहमदनगर, दि. 08 - प्रभाग 3चे दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे असतानाही आमदार संग्राम जगताप पक्षविरहीत विकासकामे करीत आहेत. प्रभाग 3 साठी मुलभूत योजनेतून, तसेच आमदार निधीतून सुमारे 4 कोटींची विकासकामे प्रस्तावित केली. त्यातील काही कामे झाली आहेत. एकवीरा चौक ते गावडे मळ्यातील रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. पंचवटीनगरमधील रस्ता आमदार निधीतून पूर्ण करण्यात आला आहे, अशी माहिती नगरसेवक संपत बारस्कर यांनी दिली.
प्रभाग 3मधील मॉडर्न कॉलनीत आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ मधुकर चन्ना यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारस्कर बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक कुमार वाकळे, निखील वारे, योगेश ठुबे, प्रमोद चन्ना, सुमंत प्रताप, बबन खेडकर, सुषमा हुडे, सुनीता पुजारी, वनिता चन्ना, अंबादास चौधरी उपस्थित होते.
वाकळे म्हणाले की, सुषमा हुडे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मॉडर्न कॉलनीत रस्त्याची मागणी केल्यानंतर त्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून दिला. या रस्त्याचे काम आज पूर्ण झाले आहे. पाईपलाईन लगतच मॉडर्न कॉलनी आहे. येथील नागरिकांवर स्वखर्चातून कामे करण्याची वेळ येत होती, असे सांगितले.
निखील वारे म्हणाले की, आ. जगताप यांचा शहर विकासाचा विधायक दृष्टिकोन असून, त्यांच्या विचारांचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून द्या. त्यामुळे सभागृहात विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम होईल, असे सांगितले.