शनिवार 38 व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे आयोजन
सांगली, दि. 21 - सांगली जिल्हा कलाध्यापक संघ आणष्ट्र राज्य कलाध्यापक संघ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 38 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद शनिवार 22 व 23 एप्रिल रोजी आयोजित केल्याची माहिती सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत माळी यांनी दिली.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील कलाविश्व महाविद्यालयात आयोजित या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे उदघाटन शनिवार 22 एप्रिल रोजी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, सांगली महापालिकेचे महापौर हारूण शिकलगार व सांगली जिल्हा परिषदेचे अध्यकमसिंग देशमुख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशन व अॅनिमेटर- फिल्म विभागा निर्माता भीमाशंकर शेंडगे यांचा जीवन गौरव पुरस्काराने, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका समिता पाटील यांचा विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कला विषयाची सद्यःस्थिती या विषयावर चर्चासत्र होणार आहे. त्यात शिक्षण संचालक नामदेवराव जरग, कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील व कलाशिक्षक शशिकांत ी सहभागी होणार आहेत. कला इतिहास व कला अभिव्यक्ती या विषयावरील चर्चासत्रात विनोद शेलार, सागर बगाडे व राजेंद्र पोळ यांचा सहभाग असणार आहे, तर ग्रेड परीक्षाव गुणांची सवलत या विषयावर अकोला येथील माजी कलाशिक्षक मोहन भोजापुरे मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार 23 एप्रिल रोजी सकाळी शिल्पकार व चित्रकारांची कला प्रात्याक्षिके सादर होणार आहेत. त्यानंतर कलाशिक्षण व कला संचालनालय या विषयावर चित्रकला व शिल्प निरीक्षक भास्कर तिखे व सुरेंद्र जगताप यांचे चर्चासत्र होणार आहे. या राज्यस्तरिय कलाशिक्षण परिषदेच्या शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तरे, समस्या व पुढील दिशा या विषयावर खुले चर्चासत्र होणार असल्याचे श्रीकांत माळी यांनी सांगितले.