सम संख्याबळात काँग्रेसला लागली स्वीकृत सदस्याची ‘लॉटरी’
पुणे, दि. 20 - पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते अजित दरेकर यांच्या नावाची चिठ्ठी उचलली गेली आहे.
सेनेने योगेश मोकाटे यांना तर काँग्रेसने अजित दरेकर यांना उमेदवारी देऊ केली होती. दोघांपैकी एकाची आज चिठ्ठीद्वारे निवड केली जाणार होती. निवडणुकीसाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्यात दरेकर यांना स्वीकृत सदस्यपदाची ‘लॉटरी’ लागली. येत्या 24 तारखेला त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. भाजपकडून गणेश बिडकर, रघुनाथ गौडा आणि गोपाल चिंतल यांनी कालच अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी अर्ज भरला आहे.