Breaking News

संगणक प्रशिक्षण वर्गास युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर, दि. 07 - सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर असल्याने, संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थी व संगणकाचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत असून, संगणक पारंगत असलेल्या विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण आत्मसात करताना आपल्या संस्कृतीची कास न सोडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले. 
युवक युवतींसाठी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व सत्यम कॉम्प्युटर्सच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसीय संगणक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा.विधाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगरसेवक संजय झिंजे तर यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, सारंग पंधाडे, मारुती पवार, दिपक खेडकर, गणेश शेळके, अजय शेडाळे, संकेत ताठे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात सत्यम कॉम्प्युटर्सचे संचालक रोहित शिंदे यांनी प्रशिक्षण वर्गाला शहरासह ग्रामीण भागतील युवक युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. या पंधरा दिवसीय संगणक प्रशिक्षण वर्गात एमएस ऑफिस, पॉवर पॉईन्ट, एक्सल, वर्ल्डपॅड, इंटरनेट, ई मेल, ऑनलाईन पेमेंट आदि शिकवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संगणक शिक्षणासाठी वयाची अट नसून, सर्वच वयातील नागरिक व महिलांसाठी देखील यापुढे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सारंग पंधाडे यांनी सांगितले. गजानन भांडवलकर यांनी आ.संग्राम जगताप यांच्या संकल्पनेने सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.