Breaking News

निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा

। भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त सावेडी मंडलच्यावतीने मधूमेह तपासणी शिबीर

अहमदनगर, दि. 07 - आजच्या धावपळीच्या जगात मनुष्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. करिअर, व्यवसाय, नोकरी, घर या चक्रव्ह्युमध्ये अडलेल्या प्रत्येकाला आपण काय कमवतो आणि काय गमवतो हेच कळत नाही. या बदलत्या जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाणे-पिणे, प्रदुषण अशा गोष्टींचा आपल्या शरीरवर विपरित परिणाम होत आहे. वेळे अभावी व्यायामाकडे दुर्लक्ष करत असल्याने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी प्रत्येकाने वेळोवेळी आपल्या शरीराची नियमित तपासणी करुन आपल्या जीवनशैलीत अपेक्षित बदल करुन दररोज थोडातरी व्यायाम केला पाहिजे, असे प्रतिपादन  डॉ. सुहास वाळेकर यांनी केले. 
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त सावेडी उपनगर शहर मंडळाच्यावतीने तोफखाना पोलिस स्टेशन येथे आयोजित मधुमेह तपासणी शिबीराचे तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नारायण वखारे, डॉ.सुहास वाळेकर, अ‍ॅलड.अभय आगकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,मुकुल गंधे, नगरसेविका उषाताई नलावडे, राजेंद्र काळे, अशोक जगताप, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, कृष्णपिंगाक्ष डांगरे, प्रमोद कानडे, संपत नलावडे, वैभव झोटींग, सुमित बटूळे, सतीश गुंफेकर, उपनिरिक्षक विकास काळे, आदिनाथ झिकरे आदि उपस्थित होते.