शेतक-यांनीही आयकर भरला पाहिजे - बिबेक देबरॉय
नवी दिल्ली, दि. 26 - शहरी भागातील रहिवाश्यांनुसार शेतक-यांनीही आयकर भरला पाहिजे, असे भारत सरकारचे वरिष्ठ सल्लागार, नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय यांनी म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी दिला असून देशात केवळ 37 दशलक्ष आयकरआहेत. ही संख्या लोकसंख्येच्या दृष्टीने फार कमी असल्याचे ते म्हणाले. भारताची सार्वजनिक आर्थिक स्थिति अत्यंत वाईट असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अनुमानानुसार देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत देशाचे कर उत्पन्न केवळ 17.7 टक्के इतकेच आहे. तर, शेतकर्यांवरील कराच्या प्रस्तावास आम्ही मान्य करत आहोत. शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रवक्ते धमेंद्र मलिक यांनी म्हटले आहे.