उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे आज जिल्ह्यात
बुलडाणा, दि. 25 - उर्जा,नवीन व नवीकरणीय उर्जा,राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावणकुळे जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:- मंगळवार, दि.25 एप्रिल 2017 रोजी सकाळी 07.30 वाजता शेगावहुन हेलीकॉप्टरने मलकापुर तालुक्यातील धरणगांवकडे प्रयाण, सकाळी 8 ते 8.30 वाजता 220/132 के.व्ही. विद्युत उपकेंद्र मलकापुर (धरणगाव) चे भुमीपुजन व 132/33 के.व्ही. विद्युत उपकेंद्र देऊळगाव राजा चे लोकार्पण, सकाळी 8.30 वाजता मलकापुर येथुन दे.राजाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण, सकाळी 9.00 ते 9.30 वाजता 132/33 के.व्ही. विद्युत उपकेंद्र देऊळगाव राजा येथे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सकाळी 9.30 वाजता दे.राजा येथून हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता बुलडाणा येथे अधिक्षक अभियंता, महावितरणच्या प्रांगणात पं.दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत 33/11 के.व्ही. उपकेंद्र सोयगाव, पेठ, उंद्री, देऊळगाव साकर्षा, लाखनवाडा, हरसोडा, नारखेड, करमोडा व एकात्मीक उर्जा विकास योजनेअंतर्गत खामगाव (वाडी ),मेहकरचा शुभारंभ भुमीपुजन सोहळ्यास उपस्थिती, सकाळी 11.00 ते 1.00 पर्यत अधिक्षक अभियंता महावितरण प्रांगण येथे जनतेच्या तक्रारी स्विकारुन निवारणास्तव राखीव वेळ, दुपारी 1.00 ते 2.00 राखीव, दुपारी 2.00 ते 4.00 लोकप्रतिनिधी समवेत बैठक, दुपारी 4.00 ते 4.30 लघु प्रशिक्षण केंद्र, विद्युत भवन येथे पत्रकार परीषद, दुपारी 4.30 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.