महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करतांना
दि. 14, एप्रिल - खरतर या सदरात आजही सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या नाकात वेसन घालण्याचे सातत्य राखायचे होते.तथापी लिखाणास सुरूवात करत असताना राहून राहून त्या मानवाची तेजोमय मुर्ती आणि त्याच तेजात चकाकणारे जाज्वल्य विचारांचे वलय मुळ हेतू पासून लक्षदुसरीकडे खेचत होते.
सव्वाशे वर्षापुर्वी भीम नावाचं तेजोवलय या मातीतून वर आले तेच मुळी कोमेजलेल्या मनांना विचारांची संजीवनी देणारा अंकुर बनून.महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले हे विचार पिढ्यान पिढ्या वैचारिक साखळदांडांच्या गुलामगीरीत पिजलेल्या समाजाला नवे जीवन देऊन गेले.1956 पर्यंत या विचार शलाकेच्या हयातीत समाजाला हवं ते सारं निस्वार्थपणे दिलं.निरपेक्षपणे केलेले हे कार्य त्यांच्या पश्चात क्रांतीची ज्योत सतत तेवत ठेवण्यास समर्थ आहे ही एकमेव अपेक्षा माञ होती.
प्रत्यक्षात या अपेक्षेलाही चवदार तळ्यातच बुडविण्याचे महापाप समाजाच्या हातून जाणतेअजाणतेपणे घडत आहे. सोशिक समाजाला गुलामगीरीच्या शोषणातून मुक्त करण्यात महामानव यशस्वी झाले.त्यांच्या हयातीत मोठी चळवळ उभी राहीली ती पुढील पिढीला विचारांचा ठाम वारसा देऊन.केवळ रंजले गांजलेले दलितच नव्हे तर जातीपातीच्या भिंती ओलांडून अखिल समाजपंथ या महामानवाच्या चळवळीला सक्रीय मानवंदना देत होता. तथापि महामानवाच्या पश्चात ही चळवळ पुन्हा एकदा व्यवहाराच्या चौकटीत बंदीस्त करून विचारांचा वारसा सांगणारे दलित दलितेर समाजाचे कथित पांढरपेशे नेते दलालांच्या गव्हाणीत रवंथ करीत असल्याचे दुर्दैवी चिञ दिसते आहे.
महामानवाच्या विचारांशी बांधिलकी जपत वाटचाल करणारा मोठा वर्ग सर्व समाजात महामानवाचे अस्तित्व जपतो आहे.माञ नेतृत्वा अभावी दिशा चुकलेला हा मोठा वर्ग कळत नकळत पुन्हा हिशेबी आणि व्यवहारी नेत्यांच्या जाळ्यात अलगद अडकतो.आणि मग पुन्हा चळवळीचे भांडवल करून व्यवहार साधणारे दलाल आपला कार्यभार उरकून घेतांना दिसतात. ात्पर्य हे की महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करतांना जाज्वल्या विचार शलाकेला असलेल्या अपेक्षा स्वार्थी ,व्यवहारी ,सत्तालोलूप नेत्याच्या हवाली करणार नाही हा संकल्प सोडा.