Breaking News

विविध योजनांच्या मंजुरीसाठी ना.विनोद तावडे यांची भेट

।  जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केली विविध विषयांवर चर्चा
अहमदनगर, दि. 14 - जिल्हा परिषद अहमदनगर मधील प्राथमिक शिक्षण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीस मंजुरी मिळावी या मागणीकरीता जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील आणि उपाध्यक्ष राजश्री घेले यांनी थेट शालेय शिक्षण, क्रिडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेवुन विविध प्रश्‍नांवर मुंबई येथे चर्चा केली.
जिल्हा परिषदेचे नुतन अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यात सर्वांत मोठा असून जिल्हयामध्ये एकुण तालुके, 1 महानगरपालिका, 7 नगरपालिका आहेत. जिल्हयात जिल्हा परिषदेच्या एकुण 3599 शाळा असुन एकुण 241344 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकुण शिक्षक 11454 आहेत. प्रशासकीय दृष्अया जिल्हा मोइा असून संनियंत्रण ठेवणे हे आव्हानात्मक काम आहे. तसेच राज्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये अहमदनगर जिल्हयाचा क्रमांक हा चारचा राहिला आहे. यामुळे एकुणच जिल्हयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणारे मुद्दे म्हणजे , शोलेय बील भरणेसाठी स्वतंत्र तरतूद उपलब्ध करुन देणे बाबत.दिर्घ रजेच्या कालावधीत रिक्त पदावर तात्पुरता शिक्षक उपलब्ध करणे बाबत तसेच प्राथमिक शाळांना संरक्षण भिंत बांधकामासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध होणेबाबत आदि विषयांचे निवदन सादर करुन चर्चा करण्यात आली.
प्राथमिक शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मिळावा
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळा असून त्यापैकी राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांच्या लगत असणार्‍या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असणार्‍या या शाळांमधील विद्यार्थ्यांचा जिविताला धोका निर्माण होण्याचा संभावना नाकारता येत नाही यासाठी संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. त्यामुळे शासन स्तरावर सदरबाबत स्वतंत्र अनुदानाची तरतुद उपलब्ध व्हावी.