Breaking News

औरंगाबादेत स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 14 -स्वाइन फ्लूमुळे ज्योतीनगरातील तरुणीचा घाटीत मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत औरंगाबादेत स्वाइन फ्लूने 15 जणांचे बळी घेतले आहेत.
ज्योतीनगरातील स्नेहल केदार मिणियार (26) हिला दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासण्या केल्या. तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट होताच उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बुधवारी सायंकाळी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे वाजता तिचा मृत्यू झाला. तिच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी नगरसेवक गिरिजाराम हाळनोर म्हणाले की, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या कानावर ही घटना टाकली असून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांना सांगितले आहे.