दिल्लीमध्ये भरधाव गाडीने पाच जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू
नवी दिल्ली, दि. 20 - दिल्लीमधील काश्मिरी गेट परिसरात भरधाव गाडीने पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले असल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गाडी चालवणार्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पदपथावर चढली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन चालविणार्या तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता . या तरुणाने वयाची 18 वर्षेही पूर्ण केलेली नाहीत असे सांगण्यात आले . या तरुणाचे नाव समर चुघ असे आहे. त्याचे दोन सहकारी घटनास्थळावरून पळून गेले. ह्युंदाई ची आय 20 ही चारचाकी घेऊन मित्राला भेटायला जात असताना समर चा वाहनावरील ताबा सुटला.