Breaking News

नऊ लाख रूपयांची फसवणूकप्रकरणी दोन व्यापार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

सांगली, दि. 21 - खानापूर तालुक्यातील गार्डी येथील आठ द्राक्ष बागायतदारांना पुणे जिल्ह्यातील बारामती येथील दोघा व्यापार्‍यांनी सुमारे नऊ लाख 12 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापविटा पोलीस ठाण्यात त्या दोघा व्यापार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखलयात गुलाब शेख व त्याचा मुलगा साजन शेख (दोघेही रा. बारामती, जि. पुणे) यांचा समावेश आहे. गार्डी येथील धनाजी जाधव यांची दोन एकर द्राक्षबाग्यांच्याकडून या दोघा शेख पिता- पुत्रांनी 6 ते 10 मार्च या कालावधीत दहा टन 24 किलो द्राक्षमाल घेतला होता. त्यापोटी गुलाब शेख याने धनाजी जाधव यांना एकूण चार लाख 26 हजार 700 रूपयापैकी एक लाख 46 हजार रूपये रोख दिले होते, तर उर्वरित रक्कम द्राक्षमाल विकल्यानंतर देतो, असे सांगितले होते.
गुलाब शेख याने गार्डी गावातीलच दादासाहेब सूर्यवंशी, रामहरी बाबर, शैलेश रसाळ, दत्तात्रय साळुंखे, किरण बाबर, राजेंद्र जगदाळे व अतुल बाबर या सात शेतक्यांकडूनही सहा लाख 32 हजार रूपये किंमतीचा द्राक्षमाल खरेदी केला होता. या सर्वांनाही द्राक्षमाल विक्री केल्यानंतर पैसे देण्याची ग्वाही या शेख पिता- पुत्रांनी दिली होती. मात्र महिना उलटून गेला तरीही शेख पिता- पुत्रांकडून पैशाबाबत काहीच हालचाल होत नसल्याने संबंधित शेतक-यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचेही भ्रमणध्वनी बंद होते.  या दोघांवरील संशय बळावल्याने यातील काहीजणांनी बारामती येथील त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली असता हे दोघेही शेख पिता- पुत्र ब-याच दिवसापासून घरीच आले नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. द्राक्ष विक्रीत आपली पूर्णपणे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या सर्व शेतक-यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेख पिता- पुत्रांविरोधात तक्रारेली.