सदनिका देण्याच्या बहाण्याने लाखोंच्या रकमेचा अपहार
ठाणे, दि. 21 - काल्हेर-भिवंडी येथे इमारतीत स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून तब्बल 7 लाख 90 हजारांच्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार रेणू जितेंद्र सिंह (रा. घाटकोपर) यांनी वर्तकनगर पोलिसात दिली आहे. वर्तकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मार्च 2012 ते एप्रिल 2013 या कालावधीत सरोज सिंग आणि श्यामराव शिंदे या दुकलीने त्यांच्या ठाण्यातील पोखरण रोड नं. 2 येथील कार्यालयात भिवंडी,काल्हेर येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सदनिका देण्याचे आमिष दाखवून रोख व धनादेशाच्या स्वरुपात रक्कम स्वीकारली होती.मात्र,चार वर्षे उलटली तरीही सदनिका मिळाली नसल्याने याबाबतची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.याप्रकरणी सहा.पोलीस निरीक्षक एस. एल. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.