तळेगाव येथे भगवान बाबा केशरी किताब पै.राम तिडके रुई यांनी जिंकला
तळेगाव येथील व्यायाम शाळे मधुन महाराष्ट्र केशरी घडणार-फुलचंदराव कराड
परळी वैजनाथ, दि. 13 - मौजे तळेगाव येथे दि.11 एप्रिल 2017 रोजी हनुमान जयंती निमित्त जयहिंद युवक व्यायाम शाळा व क्रिडा मंडळ व श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळा यांचे संयुक्त विद्यमाने भगवान बाबा केशरी स्पर्धा घेण्यात आले. या फडचे प्रमुख उद्घाटन मा.भगवान सेनेचे सर सेनापती फुलचंद कराड यांचे हस्ते करण्यात आले. श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळे मधुन महाराष्ट्र केशरी घडणार व तो पहेलवान राज्यात नाव करणार असे प्रतिपादन फुलचंद कराड यांनी केले.यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र केशरी शिवाजी केकान, परळी नगर परिषदचे उपाध्यक्ष आयुबभाई पठाण, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, इटके सर, मा.नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, भास्कर मामा चाटे, प्रा.अतुल दुबे, नानेकर सर, परळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, शिवशंकर कराड, माजी सैनिक सुखदेव यादव, टोकवाडीचे सरपंच दशरथ मुंडे, इंटकचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय गुट्टै, वैजनाथ तांबडे, डाबीचे सरपंच कृष्णा मुंडे, वाघाळाचे सरपंच बाळु सलगर, ग्रामीण पोलिल स्टेशनचे पो.नि.रामकृष्ण चाटे साहेब, कन्हेरवाडीचे बंडु मुंडे चेअरमन, माऊली फड, मधुकर मुंडे, मधुकर खाडे, कराड मुक्तराम, पै.राजेभाऊ मुंडे डाबी, बबन मुंडे डाबी पै.प्रकाश मुंडे,ऍड.अशोक मुंडे, ज्येष्ठ पै.दगडु मुंडे, पै.विनायक कांदे, पै.गोपीनाथ मुंडे, पै.के.टी.मुंडे डाबीकर, पै.व्यंक्ट मुंडे, गोंविद मुंडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन मुंडे पांगरीकर, पै.माऊली मुंडे कन्हेरवाडीकर,पै. मुंजाजी कराड दौनापुरकर, पै.दगडु प्रभु मुंडे, जयहिंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष भागवत मुंडे, उपसरपंच नारायण मुंडे, यांची प्रमुख उपस्थितीत होती.
तसेच भगवान बाबा केशरी पहिला किबात पै.अंगद शेप लाडेवडगाव यांचा प्रभाव करुन राम तिडके (रुई) यांनी भगवान बाबा केशरी किताब खेचुन आणाला.
शवेटीचे कुस्तीचे मानधन पै.दादाराव गुट्टे दादाहारी वडगाव यांचे वतीने देण्यात आले. या कार्यक्रमो आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले होते. या कार्यक्रमास समस्त गावकरी मंडळी मित्र मंडळ व बीड जिल्ह्यातुन पैहलवान व कुस्तीप्रेमी उपस्थितीत होते.