डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
जिल्हा परिषदेतून मिरवणूक; गाथा भीमपर्वांची मधून समाजप्रबोधन
नांदेड, दि. 13 - जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी भिम जयंती मंडळाच्या वतीने आज जिल्हा परिषदेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणा-या अभिवादन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर तर उद्घाटक उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण सभापती शिलाताई दिनेश निखाते, महिला बालकल्याण सभापती मधुमती राजेश कुंटूरकर, सभापती दत्तात्रय रेड्डी, माधवराव मिसाळे गुरुजी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर भातलवंडे तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, दिपक चाटे, जी.एल. रामोड, व्ही.आर. कोंडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, कार्यकारी अभियंता मिलिंद गायकवाड, बी.एन.लांडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी पंडीत मोरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, कार्यकारी अभियंता जी.एम.गुंडरे, एन.बी.बुरडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
यानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेतून ढोल ताशांसह मिरवणूक काढून रेल्वे स्टेशन नजीक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयास भव्य पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेत अन्नदान व थंड पाणी वाटप करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता जिल्हा परिषद परिसरात अविनाश भूताळे प्रस्तूत गाथा भीमपर्वांची हा भिमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे, याचा लाभ जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, नागरीकांनी घ्यावा असे आवाहन भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील मोरे, सचिव सतीश कावडे, कार्याध्यक्ष डॉ. उत्तम सोनकांबळे, जयंती मंडळाचे प्रमुख सल्लागार अविनाश देशमुख, बाबुराव पूजरवाड, एन.डी.कदम, परमेश्वर गोणारे, आर.जे.मुंडे, व्हि.बी. कांबळे, अशोक कासराळीकर, बाळासाहेब लोणे, देवेंद्र देशपांडे, अशोक पावडे, आशोक मोकले, राघवेंद्र मदनूरकर, संतोश दासरवार, शेख मुक्रम, सौ. आशा बेदरकर, उत्तम वाढवे, छाया कांबळे, उज्वला गजभारे, प्रताप रायघोळ, सिध्दार्थ हत्तीअंबिरे, व्ही.आर.असोरे, प्रसिध्दी प्रमुख मिलिंद व्यवहारे, गणेश अंबेकर, विलास ढवळे यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी भिमजयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.