जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत पै.आकाश भिंगारे विजयी
अहमदनगर, दि. 25 - छबु पैलवान क्रीडा नगरी, वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये जिल्हा तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात पै.आकाश भिंगारे याने आक्रमक खेळ करुन पै.विक्रम शेटे ला आसमान दाखविले. अर्धातास चाललेली रोमांचक कुस्ती पै.भिंगारे याने निकाली काढली. विजयी ठरलेल्या पै.भिंगारे यास चांदीची गदा, मेडल व 35 हजार रु. चे रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी पै.सुभाष लोंढे, पै.संभाजी लोंढे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, उपाध्यक्ष रामभाऊ नळकांडे, पै.रामभाऊ लोंढे, उद्योजक राजेंद्र चोपडा, पै.विलास चव्हाण, नामदेव लंगोटे, पै.नाना डोंगरे, पै.संतोष रोहकले, पै.मोहन हिरणवाळे, पै.कैलास हुंडेकरी, पै.हंगेश्वर धायगुडे, शबनम शेख, भाऊसाहेब धावडे आदि उपस्थित होते.
युवा मल्ल व महिला कुस्तीपटूंच्या लाल मातीत डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्त्या रंगल्या होत्या. कुस्त्या पहाण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. कर्जतची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हीने पुरुष मल्लांना आवाहन केल्यानुसार, प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवला. लालमातीत उतरलेल्या रणरागीनी महिला कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे महिला 42 किलो वजन गट प्रथम- धनश्री फंड (श्रीगोंदा), द्वितीय- प्रियंका डोंगरे (निमगाव वाघा ता.नगर), तृतीय- ज्ञानेश्वरी मोरे (श्रीगोंदा). 48 किलो वजन गट प्रथम- रुपाली अडसूरे (राहुरी), द्वितीय- प्रतिभा डोंगरे (निमगाव वाघा ता.नगर) तृतीय- कामिनी कांबळे (कर्जत). 55 किलो वजन गट प्रथम- सोनाली मंडलिक (कर्जत), द्वितीय- माधुरी खरमाळे (भाळवणी ता.पारनेर), तृतीय- सायली कळमकर (भाळवणी ता.पारनेर). 60 किलो वजन गट प्रथम- भाग्यश्री फंड (नगर) द्वितीय- माधुरी भोसले (जामखेड), तृतीय-सानिया चुडेवाला (नगर शहर) या वजन गटातील विजयी महिला कुस्तीपटूस स्मृतीचिन्ह, मेडल व 3 ते 5 हजार रुपया पर्यंतचे बक्षिसे देण्यात आली.