Breaking News

तुर खरेदी न केल्यास शेतकरी आंदोलन करणार

। तुर खरेदी बंद केल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकर्‍यांना   । सध्या कांद्यालाही हमी भाव राहिलेला नाही

अहमदनगर, दि. 25 - नफेडच्या माध्यमातून सुरु असलेली तुर खरेदी राज्य सरकारने बंद केल्यामुळे या निर्णयाचा फटका शेतकर्‍यांना बसु लागला आहे. नगर जिल्हामध्ये अनेक ठिकाणी तुर खरेदी न केल्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असुन आता शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. 
यंदा तुरीची विक्रमी उत्पन्न झाल्याने  खुल्या बाजारात तुरीची भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकार्‍यांंकडील तुर हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी नाफेडच्या माध्यमातून तुर  खरेदी  करण्यात  आली होती. सरकारने 50 - 50 रुपये प्रति क्विंटर दराने हमी भाव दिला होता. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. परंतु नाफेडच्या माध्यमातुन सुरु असलेली हि तुर खरेदी केंद्र सरकारने 22 एप्रिल पासुन बंद केली आहे. याचा सर्वात जासत फटका सर्वसामान्य शेतकर्‍यांना बसत असल्याने त्यांनी आंदोलनाचा आसुड उगारला आहे.
पाथर्डी तालुक्यामध्ये शेतकर्‍यांची तुर नाकारल्यामुळे तेथील गाळ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने सिल ठोकले होते. आज नगर जिल्हयातील 9 तुर खरेदी केंद्र बंद अवस्थेत आहेत. नाफेडने अत्तापर्यंत 9 केंद्रावर 2 लाख 16 हजार 47 क्विंटल तुर खरेदी केली आहे. त्याचा 19 हजार 86 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. मात्र आता केंद्र बंद झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. 22 एप्रिल अखेर जिल्हयातील 9 केंद्रावर 11 हजार क्विंटल तुर खरेदी विना पडुन आहे. तर नोंदणी नुसार सुमारे 17 हजार 500 क्विंटल तुर ही शेतकर्‍यांकडे आहे.
जर खरेदी न केल्यास शेतकर्‍यांना त्याची झळ  सोसावी लागणार आहे. नगर बाजार समितीत  खरेदी  केंद्रावर 750 शेतकर्‍यांनी आत्तपर्यंत नोंदणी केली आहे. जिल्हयामध्ये यापुर्वी कांदयाची लागवड सुध्दा मोठया प्रमाणावर झाली होती. सध्या स्थितीत कांदयाला हमी भाव राहिलेला नाही. दहा रुपयाला दिड किलो कांदा विक्रीला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याचाही मोठा फटका बसला आहे. त्यातच आता तुरीचे 9 केंद्र बंद झाल्याने अनेक ठिकाणी शेतकरी रांगा लावून तुर खरेदी होण्या करता रांगेल उभे राहिले होतेे. दुपारपर्यंत केंद्रच सुरु न झाल्यामुळे अखेरीला अनेकांनी पुन्हा माघारी आणलेला माल घेवुन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. एकंदरीतच जिल्हयात तुरीचे उत्पन्न यावेळेही जास्त झाली आहे. जर तुर खरेदी केली नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा संतप्त झालेल्या शेतक-यांनी दिला आहे.