जिल्हाधिकारी पदी श्वेता सिंघल रुजू
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) : साताराच्या नूतन जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्वेता सिंघल यांनी मावळते जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडून आज स्वीकारला. मुद्गल यांनी सिंघल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सिंघल यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मंत्रालयात त्या कामगार विभागच्या उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. आज सायंकाळी त्यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकार्यांचे स्वागत केले. बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, सातारा पालिकेच्या नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्यचा अंक देऊन तसेच मावळते जिल्हाधिकारी मुद्गल यांनी जलयुक्त शिवार अभियान ही सचित्र पुस्तिका देऊन नूतन जिल्हाधिकारी सिंघल यांचे स्वागत केले. मावळते जिल्हाधिकारी मुद्गल यांना पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
मराठा साम्राज्याची राजधानी असणार्या सातारा जिल्ह्यात काम करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. जैव विविधता, पर्यटन आणि ऐेतिहासिक वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. अशा ठिकाणी लोकाभिमुख काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. मावळते जिल्हाधिकारी मुद्गल साहेब यांनी खूप चांगले काम सातारामध्ये केले आहे. विशेषत: जलसंधारण यावर त्यांनी केलेले काम हे मला प्रेरणा देणारे असल्याचे नूतन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बोलताना सांगितले.