सरसकट कर्जमाफी हवी : विरोधक
मुंबई, दि. 08 - शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली.
सभागृहात सरकारने मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्षयात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.
सभागृहात सरकारने मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्षयात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.