एअर इंडियाच्या विमानात आणखी एका खासदाराचा गोंधळ
नवी दिल्ली, दि. 08 - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच विमानात खासदाराने गोंधळ घातल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांचा क्रू मेंबर्सशी वाद झाल्याची माहिती आहे. डोला सेन यांच्यामुळे दिल्ली ते कोलकाता या एअर इंडियाच्या विमानाला अर्धा तास उशीर झाला, असा आरोप करण्यात आला आहे. डोला सेन आपल्या आईला आपत्कालीन दरवाजापासून दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी तयार नसल्याने हा वाद झाला, अशी माहिती आहे.
डोला सेन यांच्या आई व्हिलचेअरवर होत्या. मात्र विमान प्रवासाच्या नियमानुसार त्या आपत्कालीन दरवाजाजवळ बसू शकत नव्हत्या. क्रू मेंबरने त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याची विनंती केली, तर डोला सेन यांनी कर्मचार्याशी वाद घातला. त्यामुळे विमानाला अर्धा तास उशीर झाला, असं सांगण्यात येत आहे. तिकीट बूक करताना खासदार डोला सेन यांनी व्हिलचेअरविषयी काहीही माहिती दिलेली नव्हती. मात्र प्रवासात व्हिलचेअर होती, असं स्पष्टीकरण एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजप खासदार बाबुल सुप्रीयो यांनी डोला सेन यांची पाठराखण केली आहे. खासदार नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात, असं बाबुल सुप्रीयो यांनी म्हटलं आहे.