पुणे महापौर निवडणूक, इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर
पुणे, दि. 15 - पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणुक होणार आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड निश्चित मानली जात आहे.
पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होईल. 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11, शिवसेनेला 10, मनसेला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे. भाजपकडून मुक्ता टिळक यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही महापौरपदाच्या निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.