अश्विनला मागे टाकलं, जाडेजा रँकिंगमध्ये अव्वल!
मुंबई, दि. 21 - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने, आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत जाडेजाने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच जाडेजा सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
आयसीसीच्या सध्याच्या रँकिंगमध्ये जाडेजाने भारताच्याच आर अश्विनला मागे टाकलं. यापूर्वी अश्विन-जाडेजा कसोटी गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान होते. मात्र आता 899 गुणांसह जाडेजाने पहिल्या नंबर मिळवला आहे.
जाडेजानंतर अश्विन 862 गुणांसह दुसर्या क्रमाकांवर आहे. तर त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेरथ (854) तिसर्या, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड (842) चौथ्या आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन (810) पाचव्या क्रमांकावर आहे.