सलग 19 कसोटी सामने अपराजित राहिलेल्या विराटला पराभवाची चव
पुणे, दि. 26 - तब्बल 19 कसोटी अपराजित राहिल्यावर भारताला अखेर पराभवाची चव चाखावी लागली आहे. हैदराबाद कसोटीत बांगलादेशवरील विजयानंतर विराट हा भारतातर्फे सलग सर्वाधिक म्हणजे 19 सामने अपराजित राहणारा कर्णधार ठरला होता. विराटनं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांचा 18 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. पण हा विक्रम आणखी उंचावण्याची किमया विराटला साधता आली नाही. ऑगस्ट 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर थेट फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं.
पुणे कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावांत मिळून केवळ 13 धावाच करता आल्या. या कसोटीच्या पहिल्या डावात तर कोहलीला भोपळाही फोडता आला नव्हता. मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची ही आजवरची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. विशेष म्हणजे कोहलीनं पुणे कसोटीच्या दोन्ही डावात डावखुर्या गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कनं कोहलीला माघारी धाडलं. तर दुसर्या डावात स्टीव्ह ओ’कीफनं विराटला चकवलं.
पुणे कसोटीतील विजय हा ऑस्ट्रेलियाचा गेल्या तेरा वर्षातला भारतीय भूमीवरचा पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. याआधी 2004 साली नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला 342 धावांनी हरवलं होतं. त्यानंतर पुढच्या 11 कसोटींत 9 वेळा ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला तर दोन सामने अनिर्णित राहिले होते. पराभवांची ती मालिका स्टीव्हन स्मिथच्या टीमनं मोडली आहे. कांगारुंच्या या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या मालिकेतली चुरसही आणखी वाढली आहे.