Breaking News

राज ठाकरेंना जाब विचारण्याची हीच वेळ

दि. 17, जानेवारी - महाराष्ट्राला संत महात्मे, युगपुरूषांची भुमी म्हणून विश्‍वमान्यता आहे. ती काही उगीच नाही. या मातीच्या सुपिकतेचा तो गुण आहे. ही बाब  भल्या भल्यांना समजली पण प्रबोधनकारांचा वारसा सांगणार्‍या राज नावाच्या बाळाला माञ तेव्हढी समज आली आहे. असं वाटणारा एकही गुण महाराष्ट्राला अद्याप  दिसला नाही. आमचा हा समज गैर असेल तर राज पुर्ण समजूतदार असूनही केवळ अभिनिवेश जपण्यासाठी ढोंग करीत आहेत,आणि त्या ढोंगाच्या प्रेमात पडून  आपल्या आजोबांसह काकांच्या विचारांशीही घोर प्रतारणा करीत आहेत हे मान्य करावे लागेल.आणि म्हणूनच या महाराष्ट्राने राज ठाकरेंना जाब विचारण्याची वेळ  आली आहे.
महाराष्ट्राची जनता जेव्हढी सोशिक आहे तेव्हढीच प्रसंगी आक्रमक आहे,प्रत्येकाला संधी देणारा महाराष्ट्र प्रसंगी पायदळी तुडवायला मागे पुढे पहात हा अनुभव राज  ठाकरेंना आलाच असेल.जनतेला गृहित धरून अधिक काळ राजकारण करता येत नाही ही अनेकांना येणारी अनुभूती राज ठाकरे यांना तुलनात्मक दृष्ट्या खुपच  लवकर आली तरीही स्वतःला जाणून घेण्याचे भान येत नाही.
महाराष्ट्राची जनता भोळी असली तरी दुधखुळी नाही हे राज ठाकरे यांना पहिल्या झटक्यातच समजायला हवे होते.माञ ते समजणार नाही कारण ते केवळ  जन्मनावाने ठाकरे आहेत.ठाकरे घराण्याचा कुठलाच गुण त्यांच्या राजकारणात उतरला असे म्हणण्याचे धाडस करता येणार नाही. प्रबोधनकार ठाकरे यांचे ते  नातू.....प्रबोधनकारांनी आयुष्यभर धर्ममार्तडांविरूध्द संघर्ष केला,कर्मकांडांची दुकानदारी उध्वस्त व्हावी म्हणून जागर मांडला त्या प्रबोधनकारांच्या विचारांना  गाडण्याचे पाप नातवाने  करावे या पेक्षा भयानक  प्रतारणा कुठली असू शकते.छञपतींसमोर हजारदा नतमस्तक होणारे आजोबा आणि काका यांच्या विचारांना  तिलांजली देत अवघ्या महाराष्ट्रातील अठरापगड बारा बलुतेदार बहुजन रयतेचे आराध्य दैवत असलेल्या दैवताची बदनामी करणार्‍या प्रवृत्तींना डोक्यावर घेऊन  मिरविणार्‍या राज ठाकरे यांचे छञपती, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने काय करायला हवे? हे सांगण्यासाठी कुणा भटाची गरज नाही. त्याचा निर्णय  महाराष्ट्राने केंव्हाच घेतलाय.
एकामागून एक झटके बसल्यानंतरही हा माणूस महाराष्ट्राची मानसिकता समजून घ्यायला तयार नाही.या मानसाने महाराष्ट्राच्या दैवतांची बदनामी करण्याची सुपारीच  घेतल्याचे दिसते आहे.अलिकडे तर मती फिरावी अशा पध्दतीने राज ठाकरे वक्तव्यं करू लागल्याने मतदार म्हणून जाब विचारण्याची वेळ आली आहे.थेट राज  ठाकरे यांना जाब विचारण्याचे कुठलेच  ओचित्य नाही.फायदाही होणार नाही.निखळ मनाने कुठल्याच प्रश्‍नांची उत्तरं राज ठाकरे देऊ शकत नाहीत. अडचणीच्या  प्रश्‍नांनां उत्तर देण्याऐवजी प्रश्‍न कर्त्याला दरडवण्यातच त्यांना अधिक स्वारस्य असते.म्हणूनच राज ठाकरे यांचा उमेदवार जेंव्हा आपल्या दारात मतांची भिक  मागण्यासाठी कटोरं घेऊन उभा राहील तेंव्हा हा जाब त्या उमेदवाराला विचारा..राज ठाकरेंना सत्ता का द्यायची? विचारा कारण त्यांना? जो आपल्या आजोबांच्या  विचारांना न्याय देऊ शकत नाही,ज्यांचे बोट धरून राजकारणाचे धडे गिरविले त्या काकांच्या हयातीतच त्यांना धोका दिला केवळ सत्तेसाठी! तो नेता महाराष्ट्राच्या  जनतेला काय देणार?