Breaking News

मुळ प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न !

दि. 17, जानेवारी - आजारावर औषधौपचार करूण आजार बरा करण्याऐवजी पेशंटलाच संपवण्याची पध्दत अलीकडच्या काही निर्णयावरून रूढ होत आहे.  सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आपले गार्‍हाणे फेसबुकच्या माध्यमातुन मांडले. त्याचा साधा प्रश्‍न होता, जवांनाना देण्यात येणार जेवण हे निकृष्ट दर्जाचे देण्यात  येते. त्याची चौकशी करणे क्रमप्राप्त असतांना, नवनियुक्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी जवांनाना सोशल मिडीया वर व्यक्त होण्यास बंदी घालण्यात आली. मुळे  प्रश्‍नाला बगल देऊन सोशल मिडीयावर शस्त्र क्रिया करण्याची राजकीय मानसिकता समजु शकतो. मात्र लष्करप्रमुख जे, करडया शिस्तीचे ओळखले जातात, जे  देशातील लष्करासंबधी अचुक आणि योग्य निर्णय घेऊ शकतात, सर्व शक्यतेची पडताळणी करून थेट हल्ला करण्यासाठी जे रणनिती आखतात, तेच जर असा  निर्णय घेऊ शकतील तर, सीमा सुरक्षा जवांनानी आपले गार्‍हाणे कुणाकडे मागायचे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. सीमा सुश्रक्षा दलासह, जवानांचे अनेक प्रश्‍न अनेक  वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र त्या प्रश्‍नांना कधी वाचा फुटत नाही, की त्यावर चर्चा करण्यात येत नाही. त्यामुळे जवान मनमारून जे मिळेल तो आहार घेत  असतो. कारण त्याला सार्वजनिक वक्तव्य केल्यास आपल्या नोकरीवर गदा येईल याची त्याला भीती असते. मात्र तेजबहादुर याने ते धाडस दाखवत जवांनाच्या  समस्या फेसबुकवर मांडण्याचे धाडस दाखवले. मात्र त्याच्या आरोपांची शहानिशा करण्याऐवजी, त्याचीच मानसिकता बिघडलेली असून, तो बेशिस्त असल्याचे  आरोप करण्यात आले. मात्र त्याने मांडलेल्या समस्येवर कोणतीच प्रतिक्रिया संरक्षणमंत्र्यापासून, ते गृहमंत्र्यापर्यंत कुणीच दिली नाही. मात्र जवांनाना देण्यात येणारा  हा आहार बणुन समाजमन मात्र हेलावले. आपले संरक्षण करणारे असे जीवन जगतात म्हणून त्यांना वेदना झाल्या. आणि त्यांनी त्या जवांनाच्या समस्या शेअर  करण्यास सुरूवात झाली. आणि सोशल मिडीयावर सरकारवर टीकेचा भडीमार सुरू झाला. मात्र सरकारने त्या जवांनाच्या तक्रारीवर खिलाडुवृत्ती दाखवुन चौकशी  करण्याचे धाडस नाकारले. पुन्हा असा एखादा तेजबहादुर सोशल मिडीयावर अवतारू नये म्हणून सोशल मिडीयाची बंदीच जवानांना घालण्यात आली. वास्तविक  बघता, जर कोणत्याही जवानांने सुरक्षेविषयी भाष्य केले असते, ज्यामुळे शत्रंना मदत होईल, त्यावेळेस त्यांच्यावर होणार्‍या टीकेचा रोख समजु शकतेा. मात्र इथे  त्याने आपल्या स्थानिक देशातील सत्ताधार्‍याकडून, प्रशासनाकडून होणारा छळ, भुक मिटवतांना होणार्‍या वेदना मांडल्या. मात्र त्यावर चर्चा होणे अपेक्षित  असतांना त्याने ज्या माध्यमावर हे व्यक्त केले, ते माध्यमांची बंदी जवानांसाठी घालण्यात आली. वास्तविक बघता तुरूगांत जे कैदी जीवन जगत आहे, त्यांना  मिळणारा आहार कैकपटीने उत्तम असल्याचे निदर्शनास आले आहे. जे आरोपी, खुन, बलात्कार, यासह गंभीर गुन्हयामध्ये तुरूंगाची शिक्षा भोगत आहेत, त्यांचा  आहार हा जवांनापेक्षा उत्तम आहे. त्यामुळे चर्चा होण्याची गरज आहे, मुळ प्रश्‍नांची. मात्र सोशल मिडीयावर चर्चा व बंदी करून लष्करप्रमुखांनी मुळ चर्चेला बगल  देण्याचा प्रयत्न केला.