नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, शुध्दीत करा
महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराचे वितरण
बुलडाणा, दि. 01 - आज तरूणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंतेचा विषय आहे. दारू पिणे ही फॅशन झालेली आहे. खेदाची गोष्ट की, व्यसनाला प्रतिष्ठाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आजचे तरूण नवीण वर्षाच्या स्वागतासाठी मित्रांच्या आग्रहाखातर किंवा अनुकरणानुसार दारूचा पहिला घोट घेतात आणि आयुष्यभर दारूचे होतात.’’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था, सुंदरखेड अंतर्गत गिताई व्यसन मुक्तीधाम, सावळा, ता.जि.बुलडाणा यांनी तरूणांना संदेश देण्यासाठी व व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी तसेच मतपरिवर्तन करण्यासाठी नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, शुध्दीत करा! रॅली, चित्रप्रदर्शनीचे गांधी भवन, बुलडाणा येथे दिनांक 31 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजन केले होते.
चित्रप्रदर्शनीमध्ये दारूची कारणे, दारूचे दुष्पपरिणाम व त्यावरील उपाय तसेच संत महात्म्यांचे व्यसनाविषयीचे विचारांची मांडणी केले होते. दारूचा शेवट हा अंत्ययात्रेमध्ये होते याच एक बोलक पथनाट्य सादर केल.
कार्यक्रमाचे चित्रप्रदर्शनी व रॅलीचे उद्घाटन डॉ.सुकेश झंवर, मुख्य कार्यकारी संचालक, बुलडाणा अर्बन, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दिपक बाजड, तहसिलदार बुलडाणा, प्रमुख उपस्थिती म्हणुन मो.सज्जाद, नगराध्यक्ष, न.पा.बुलडाणा, सौ.जयश्रीताई शेळके, मनोज मेरत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा, नरेंद्र लांजेवार, साहित्यीक, टि.ए.सौर सर, शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्राप्त, स्वातंत्र्य सौनिक गिरीकाका, गुरूदेव सेवा मंडळाचे वाकोडे गुरूजी हे उपस्थित होते.
दिपप्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेमहाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविकामध्ये गणेश वानखेडे यांनी तरूणांना व्यसनच करायचे असेल तर मंचाकावरील प्रमुख पाहुण्यांचा आदर्श घेऊन समाजाप्रती ॠण फेडण्याचं व्यसन करण्याचे आव्हान केले.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ज्यांनी गावांमध्ये दारूबंदी केली व व्यसनमुक्तीचे कार्य केले अशा कलावती देवराव बिल्लारी, रा.केसापुर, सुनिता श्रीकिसन भांड, रा.बिबी, मुक्ताबाई शामराव नागरे, रा.ढालसावंगी, यशोदाबाई शंकर लष्कर, रा.पिं.सराई या महिलांना व किर्तनातुन प्रबोधन करणारे दिपक महाराज सावळे, प्रमोद दांडगे, हरीदास खांडेभराड यांना म.गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.