जिल्हाधिकारी चषकाचे जिल्हा पोलीस दल विजेते
सातारा, दि. 20(प्रतिनिधी) : राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धा झाल्या. यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या संघाने प्रथम क्रमांक व फिरता चषक पटकावला. स्पर्धेत एकूण 28 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संग्राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे प्रथम क्रमांकाचे 10 हजारांचे बक्षीस व फिरता चषक जिल्हा पोलीस दल क्रिकेट संघाला प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे 7 हजार रुपये व चषक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जिद्दी शिक्षण क्रिकेट संघ, सातारा तर तृतीय क्रमांकाचे 5 हजार व चषक जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे पशुसंवर्धन क्रिकेट संघ सातारा यांना देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे 3 हजार व चषक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सातारा कार्यालयातर्र्फे पाटबंधारे विभाग क्रिकेट संघ कृष्णानगरला देण्यात आले. अष्टपैलू खेळाडू म्हणून वैभव चिखले, बेस्ट बॉलर म्हणून बळीराम कीर्दत, बेस्ट फलंदाज संदीप माने यांना गौरवण्यात आले. विजेत्या संघांना छ. शाहू क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, डॉ. महेश कदम, जिल्हा कोषागार अधिकारी दीपक शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रकाश घाडगे, संदीप चाळके, महेंद्र गोसावी, दीपक सपकाळ, सुनील साबळे, गणेश देशमुख, शशिकांत चांदणे, प्रमोद उगले, व्ही. डी. राजगे, मंगेश खरात, चंद्रकांत जाधव, संतोष कळसकर, लक्ष्मण भोसले, एम. एस. पांचाळ, रविंद्र पन्हाळे, पृथ्वीराज गायकवाड, आनंदा घाडगे, महेश पोळ, विष्णू नलावडे, शशिकांत चांदणे, शाहीर रणदिवे यांनी परिश्रम घेतले. विनोद नलवडे यांनी सूत्रसंचलन केले. प्रमोद चतुर यांनी आभार मानले.