राहुल गांधींचं परदेशात न्यू ईयर सेलिब्रेशन, ट्विटरवरुन देशवासियांना शुभेच्छा
नवी दिल्ली, दि. 01 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशात न्यू ईयर सेलिब्रेट करत आहेत. नुकतेच ते परदेश दौर्यावर गेले आहेत. पुढील काही दिवस आपण परदेशात असल्याचं सांगत त्यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मी पुढील काही दिवस परदेश दौर्यावर असेन. सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला यशाचं आणि आनंदाचं जावो अशी मी प्रार्थना करतो असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नोटाबंदीनंतर राहुल गांधींनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. नोटाबंदीला विरोध करत 6 जानेवारीला देशभर काँग्रेस पक्षाकडून बंद पुकारला जाणार आहे. राहुल गांधींनी कधीपर्यंत भारतात परत येणार हे सांगितलं नसलं तरी राहुल गांधी आठवडाभरात भारतात परतण्याची शक्यता आहे.