करिअरचा विचार करूनच शिक्षण घ्या ः प्रभाकर ओहोळ
अहमदनगर, दि. 11 - अत्याधुनिक युगात इंग्रजीला महत्त्व प्राप्त झाले असून, इंग्रजीवर आपली कमांड असणे आवश्यक आहे. करिअरच्या संधी जरी पुष्कळ असल्या, तरी या संधीचा लाभ घेता येण्यासाठी आपल्याकडे पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण घेताना पुढील करिअरच्या दृष्टीने विचार करून ते घ्यायला हवे, असे प्रतिपादन प्रभाकर ओहोळ यांनी केले.
शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग 21 मधील 10 वी व 12 वीतील
गुणवंतांचा डिक्शनरी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, प्रभाकर ओहोळ, अरविंद गोरेगांवकर, सदाभाऊ शिंदे, सुभाष दारव्हेकर, जयंत शिंदे, अॅड. मंगेश दिवाणे, अॅड. केदार केसकर, शहाजी डफळ, बाबा वैद्ये, रंगनाथ सांगळे, दामोधर भोसले, हाजी दौलतखान पठाण, भूषणभाई, अनिल शिंदे, गोरख डागवाले, रोहन डागवाले, सचिन चवंडके, नितीन डागवाले, विशाल भालेराव, राजेश भरेकर, सागर गोरे, गणेश चवंडके, अंबादास इप्पलपेल्ली आदी उपस्थित होते.
ओहोळ पुढे म्हणाले की, अशा सन्मान सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन हे प्रेरणा मिळते. नगरसेवक किशोर डागवाले सातत्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करीतच असतात. गुणवंतांचा सत्कार सोहळा ते दरवर्षी न चुकता आयोजित करतात. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे ते म्हणाले. डागवाले म्हणाले की, शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करून त्यांचे कौतुक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना येणार्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक सण, उत्सव आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुणवंतांचा सत्कार हार, तुरे, शाल देण्यापेक्षा भविष्यात त्यांना उपयोगी पडेल व ज्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशी डिक्शनरी देऊन केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमासाठी सुभाष दारव्हेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.