वाद्यांवर नृत्य करणारे घोडे मिरवणूकीचे आकर्षण
अहमदनगर, दि. 03 - सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या जुना बजार येथील हजरत हाजी मद्दुआशाह कादरी (रहे.) यांच्या दर्गाचा संदल-उरुस मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. संदल- उरुस निमित्त दर्गापासून पारंपारिक वाद्यांसह मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शहरासह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्गाच्या संदल-उरुस निमित्त बुधवारी संध्याकाळी निघालेल्या मिरवणुकित घोड्यांच्या रथामध्ये फुलांची चादर सजवण्यात आली होती. ढोलकीच्या तालावर नृत्य करणारे घोडे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. मिरवणुकीत घोड्यांनी नृत्याद्वारे दोन पायावर उभे राहून दिलेल्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डोलीबाजा व पारंपारिक वाद्याने मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी युवकांमध्ये उत्साह संचारला होता. जुना बाजार, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक येथून शोभयात्रेचे मार्गक्रमण करत जुना बाजार दर्गाह येथे शोभयात्रेची सांगता झाली. दर्गाच्या मजारवर संदल लावून उपस्थित भाविकांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली.