Breaking News

तुषार व थिबक अनुदानासाठी कॉग्रेस आंदोलन उभारणार

बुलडाणा, दि. 07 - बुलडाणा जिल्हा दुष्काळाने होरपळत असतांना आणि येत्या खरीप हंगामासाठी पिक कर्जाचे पुनर्गठण व खते आणि बि-बियाण्याची तजबीज करण्याची समस्या शेतकर्‍यांसमोर असतांना त्यांच्या हक्काचे तुषार व ठिबक सिंचनचे 87 कोटी रूपये रखडलेले अनुदान देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. शेतकर्‍यांची या समस्येवर यापूर्वी विधानसभेत आवाज उठवून विधानभवनासमोर आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी उपोषन केले होते. मात्र अद्याप अनुदान वितरीत झालेले नाही. त्यामुळे रखडलेले हे 87 कोटी रूपये अनुदान शेतकर्‍यांना तात्काळ मिळावे यासाठी अनुदान मिळेपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केला असून त्यासाठी जिल्हाव्यापी आंदोलन उभारण्याच्या दृष्टीने त्यांच्या थकित अनुदान विषयीची माहिती त्या त्या तालुक्यातील कॉगे्रस कमिटीकडे शेतकर्‍यांनी दयावी अशी आवाहन केले आहेत.
पिक हंगाम 2015-16 पर्यंत बुलडाणा जिल्हयात शेतकर्‍यांनी आपल्या शेतात बसविलेले तुषार व ठिबक सिंचन यासाठीचे श्शासकिय अनुदान देण्यासाठी शासनाने टाळाटाळ सुरू केलेली असून वरिल शेतक-यांनी थिबक किंवा तुषार संच बसविण्यापूर्वी पुर्व परवानगी घेतली नाही असे अजब कारण समोर केले आहे. वस्तुत: महाराष्ट्रभर ज्या पध्दतीने तुषार किंवा ठिबक संच बसविल्या जातात त्याच पध्दतीने बुलडाणा जिल्हयातही कृषी अधिका-याचे मार्गदर्शनाखाली शेतक-यांनी आपल्या श्शेतात संच उभारलेले असतांना श्शेतक-यांना खोटे ठरवित पैसे देण्यासाठी प्रयत्न करण्याएैवजी माजी पालकमंत्रयांनी सदर ठिबक किंवा तुषार संच बसविलेच नाही असे वक्तव्य करून श्शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या थकित अनुदानासाठी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी हिवाळी अधिवेशनात विधानभवनासमोर उपोषणही केले आणि वेळोवेळी विधानभवनात यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करून श्शासनाचे लक्ष वेधले मात्र श्शासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्या गेली नाही.
या अनुदानासाठी शेतक-यांनी  कृषी विभागाकडे चकरा मारून अर्ज विनंत्या करून त्रस्त झाले. अनुदान मागणीसाठी गावातून कार्यालयापर्यत येण्या जाण्यासाठी अनुदानापेक्षा अधिक खर्च काही ठिकाणी झाल्याचे समोर आले आहे. या सर्व उपेक्षित शेतक-यांना त्यांचे हक्काचे अनुदान मिळवून दयायचेच असा निर्धार बुलडाणा जिल्हयाचे पालक आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केला असून शेतक-यांना अनुदान मिळण्यासाठी त्यांचा अनुदाना संदर्भात लेखी स्वरूपातील माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्षांकडे देण्याचे आवाहन केले आहे. 2015-16 पर्यंत ठिबक संच व तुषार संच बसवून रितसर प्रस्ताव दाखल करूनही या श्शेतक-यांचे अनुदान बाकी नसल्याची भूमिका श्शासनाने  घेतलेली असल्याने त्यांच्या ठिबक व तुषार संचाचे प्रस्तावाची माहिती तालुका काँग्रेस कमिटीकडे देण्याचे आवश्यकता असल्याचेही यावेळी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
 जिल्हाभर काँग्रेस कमिटीकडे जमा होणारी माहितीच्या आधारे थकित अनुदान मिळविण्यासाठीचे आंदोलन अनुदान मिळेपर्यंत सुरूच राहणार असून त्यासाठी श्शेतक-यांनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्या कडे संपर्क करण्याचेही आवाहन केले आहे.