Breaking News

विजय धट यांच्याकडून देवकर कुटुंबास 10 हजारांची मदत

म्हसवड, दि. 07 -  येथील पंढरपूर रोडवर उभारण्यात आलेल्या दुभाजकामध्ये बसवण्यात आलेल्या विद्युत खांबावरील विजेच्या तीव्र धक्क्याने येथील आकाश देवकर या युवकाचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांस माजी नगराध्यक्ष विजय रामचंद्र धट यांनी 10 हजार रुपयाची मदत केली. 
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेवक बबन अबदागिरी, माजी नगरसेवक गणेश देवकर कुटुंबास मदत देताना विजय धट चंद्रकांत केवटे, दत्तात्रय त्रिगुणे व वैभव गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी 10 हजार रुपये रकमेचा धनादेश मृत आकाश देवकर यांच्या वडिलांच्या स्वाधीन करताना धट म्हणाले की, या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आकाशच्या कुटुंबियांवर खूप मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. यामध्ये देवकर कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा मृत झाला आहे. देव त्यांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो. कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावला गेला असल्याने त्यांना शासकीय मदत देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.