राफेल नदाल विंबल्डनमधून बाहेर
माद्रिद, दि. 10 - फ्रेंच ओपन स्पर्धेत झालेल्या मनगटाच्या दुखापतीतून अद्यापीही पूर्ण बरा झाला नसल्याने यंदाच्या विबल्डन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय स्पेनचा खेळाडू राफेल नदाल याने जाहीर केला आहे. फेसबुक पेजवर नदालने त्यासंदर्भात आपले म्हणणे मांडले आहे. राफेल म्हणतो, हा निर्णय घेताना अतिशय यातना होत आहेत. मात्र डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर व वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर पुन्हा खेळण्याची जोखीम उचलणे शक्य नसल्याचे समजले आहे. यामुळे यंदा विंबल्डनमध्ये न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. फ्रेंच ओपन दरम्यान झालेली दुखापत बरी होण्यासाठी आणखी वाट पाहणे आवश्यक आहे.
30 वर्षीय नदालने टेनिस कोर्टवर पुन्हा नक्की येणार असल्याचे सांगतानाच रिओ ऑलिंपिकसाठी आत्ता खेळण्याचा धोका पत्करत नसल्याचेही सांगितले आहे. 14 वेळा ग्रँडस्लॅमचा मानकरी ठरलेल्या नदालने 2008 व 2010 साली विंबल्डन चषकावर त्याचे नांव कोरले आहे. फ्रेंच ओपनमधून मात्र त्याला दुसर्या फेरीतच माघार घ्यावी लागली होती.