Breaking News

वर्धा - लष्करी दारुगोळा भांडार स्फोटात

दोन अधिका-यांसह 17 जवानांचा मृत्यू

वर्धा, दि. 31 - वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारामध्ये (सीएडी कॅम्प) झालेल्या स्फोटात दोन अधिका-यांसह एकूण 17 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील गावांना जबर हादरे बसले.
 मृतांमध्ये लेफ्टनंट कर्नल आर एस पवार आणि मेजर मनोज यांचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वर्ध्याला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेवर शोक व्यक्त केला असून आपण पिडीतांच्या कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे. जखमी जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थन करत असून मनोहर पर्रिकरांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितल असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.