सायना इंडिया ओपनच्या उपांत्य सामन्यात
नवी दिल्ली, दि. 2 - देशाची अग्रण्य महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सिरी फोर्ट स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये सुरू असलेले योनेक्स सनराइज इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी वर्गाच्या उपांत्य सामन्यात पोहचली आहे. सायनाने उपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण कोरियाच्या ह्यून जी सुंगला 19-21, 21-14, 21-19 ने पराभूत केले. हा सामना एक तास 23 मिनट चालला. उपांत्य सामन्यात सायनाचा सामना तीसरी मानंकित चीनच्या ली जुइरेईशी होईल. जुईरेईने आपल्याच देशाची शिजियान वांगला 20-22 21-12 17-21 ने मात देऊन उपांत्य सामन्यात जागा बनवली. स्पर्धेतील दुसरी मानंकित सायनाने गुरुवारी आपल्या दुसर्या टप्प्यातील सामन्यात थायलंडच्या इनतचाओन जिंदापोलला नमवले होते. ऑलिम्पिकमध्ये कास्य जिंकलेल्या सायनाने हा सामना 42 मिनटात 21-19 21-14 ने जिंकला होता.