वाडेगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेळके
पारनेर, दि.1 तालुक्यातील वाडेगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भानुदास शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. एक महिन्यापूर्वी विद्यमान उपसरपंच नितीन शेळके यांनी इतर सदस्यांना उपसरपंचपदाची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज रिक्त पदासाठी नवनाथ शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.यादव यांनी नवनाथ शेळके यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. शेळके यांना सूचक म्हणून रवींद्र शेळके होते. या वेळी सरपंच संध्या शेळके, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला यादव, सुलोचना रासकर, मंदाकिनी झांबरे, नंदिनी शेळके, तुषार पवार, सुनील बोरगे, सविता बोरगे, उपसरपंच नितीन शेळके, माजी सरपंच जयसिंग धोत्रे, प्रमोद घनवट, प्रशांत शेळके, बाळासाहेब वारे, रमेश बोरगे, अरुण यादव, रामभाऊ शेळके, माजी उपसरपंच संतोष शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.उपसरपंचपदी नवनाथ शेळके यांची निवड झाल्याबद्दल पारनेरचे आ. विजय औटी, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, उपसभापती राणी लंके, नारायणगव्हाणचे सरपंच सुरेश बोरुडे, मावळेवाडीच्या सरपंच हेमलता कुरकुरे, यादववाडीचे माजी सरपंच अरविंद यादव यांनी अभिनंदन केले आहे.