पाथर्डी बाजार समिती; सभापतीपदी शिरसाठ, उपसभापती सातपुते
पाथर्डी, दि. 1 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गहिनीनाथ शिरसाट यांची उपसभापतीपदी विष्णू सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. स्वच्छ व शेतकरी हिताचा कारभार करू,असे नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी सांगितले.बाजार समितीच्या यापूर्वीच्या पदाधिकर्यांनी केलेल्या कारभाराचे लेखापरिक्षण करून नवीन कारभार सुरू करण्याची घोषणा अँड़प्रताप ढाकणो यांनी केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. सभापती पदासाठी गहिनीनाथ शिरसाट तर उपसभापती पदासाठी विष्णू सातपुते यांचेच अर्ज आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे चौधरी यांनी जाहीर केले. त्यांनतर जगदंबा आघाडीच्या कार्यकर्त्यांची बाजार समितीच्या मैदानावर सभा झाली. माजी आमदार चंद्रशेखर घुले, अँड़प्रताप ढाकणो, बाळासाहेब ताठे, किरण शेटे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे ,नारायण धस, वसंत आमटे, संपत गायकवाड, अशोक आकोलकर, वंसत आमटे, राजेंद्र खेडकर अमोल बडे आरती निर्हाळी, रत्नमाला उदमले आदी उपस्थित होते. या वेळी प्रताप ढाकणो म्हणाले, विरोधकांनी बाजार समितीचा कारभार चांगला केला नाही म्हणून सभासदांनी सत्ता आमच्या ताब्यात दिली. बाजार समितीचा विकास आराखडा तयार करू.पूर्वीच्या संचालकांनी केलेल्या सर्व गैरव्यवहाराचे लेखा परिक्षण करून जनतेसमोर मांडू. आम्ही नवीन केलेली कामे दरवर्षी जनतेसमोर मांडू. शेतकरी भवन उभारून शेतीमालाच्या विक्रीसाठी मॉल उभारण्यात येईल. आम्हाला कारखाना चालविता येतो का अशी टीका करणारांनी बाजार समिती, दूध संघ व खरेदी विक्री संघाची वाट लावली आहे. या वेळी बाजार् सामिती कशी आदर्श असते हे सांगायला मी येईन, असे सांगून चंद्रशेखर घुले निघून गेले. नूतन सभापती शिरसाट म्हणाले, मला सभापतीपद दिल्याने निष्टावान कार्यकर्त्यांना न्याय मिळतो हे स्पष्ट झाले आहे. चांगला कारभार करू. जगदंबा आघाडीने दिलेली आश्वासने पाळली जातील नारायण धस व वसंत आमटे या दोन संचालकांनी सभापती निवडीच्या वेळी अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली. धस यांच्या सर्मथकांनी जगदंबा आघाडीच्या नेत्यांचा निषेधही केला. मात्र, निवडीनंतरच्या सभेला धस व आमटे हजर होते.