विरोधी आमदार मंत्र्यांकडे नेतात कामे, विरोधी नेत्यांनी व्यक्त केली हतबलता
मुंबई, दि. 1- राज्यात प्रचंड दुष्काळ असून शिवसेनेसह सर्व विरोधकांनी शेतकर्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी सतत दोन-तीन अधिवेशनात लावून धरली होती. दुष्काळासोबतच विनोद तावडे यांचे संचालकपद, चिक्की घोटाळा असे अनेक विषय विरोधकांकडे होते. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरतील असे वाटत होते. परंतु तीन आठवडे झाले तरी विरोधकांची धार दिसून आली नाही. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या तीन मंत्र्यांची सीडी सादर करू, असे म्हटले होते. परंतु ती सीडी अजूनही सादर झाली नाही. विरोधकांच्या कर्जमाफीच्या घोषणेलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केराची टोपली दाखवली तरीही विरोधकांनी आक्रमकपणा दाखवला नाही.
राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याशी बोलताना त्यांनी सांगितले, आम्ही आक्रमकपणा दाखवला परंतु सत्ताधार्यांच्या आक्रमकतेपुढे आम्ही कमी पडलो. सत्ताधारी अजूनही विरोधक असल्याप्रमाणेच आक्रमकतेने उत्तरे देत आहेत तर आम्ही अजूनही सत्ताधार्यांच्याच भूमिकेत आहोत असे वाटते. आज राज्यमंत्री दिलीप कांबळे ज्या पद्धतीने उत्तर देत होते त्यावरून हे स्पष्ट होते. आम्ही अजूनही फक्त विकास कामांवरच चर्चा करतो. आमचे आमदारही विकासकामेच घेऊन येतात. अनेक आमदार मंत्र्यांच्या केबिनमध्ये आपली कामे घेऊन जातात आणि कामे करवून घेतात. त्यामुळे सभागृहात म्हणावा तसा आवाज उठवला जात नाही.
भुजबळ प्रकरणाचा परिणाम
आम्हाला बोलण्याची संधीच दिली जात नाही. आम्ही बोललो तरी मीडिया त्याला योग्य स्थान देत नाही, अशी खंतही या नेत्याने व्यक्त केली. छगन भुजबळ, रमेश कदम प्रकरणामुळे काही प्रमाणात परिणाम झाला आहे. राष्ट्रवादीची इमेज त्यामुळे जनमानसात वेगळी होत असल्याने या नेत्याने सांगितले.