Breaking News

सेंद्रिय शेती ही काळाची गरज : मंजुषा गुंड




सेंद्रिय शेती ही काळाची गरज : मंजुषा गुंड
 अहमदनगर, दि. 1 रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी असून यातून ग्रामीण भागातील स्वच्छतेची समस्याही मार्गी लागू शकते. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत असून जास्तीत शेतकर्‍यांनी या सेंद्रीय शेतीकडे वळावे तसेच अपांपरिक उर्जेचा वापर वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केले.
अ.नगर जिल्हा परिषद, कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुे विद्यमाने कृषी विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे सभागृहात शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्ग व अपारंपरिक उर्जा माहिती जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षा गुंड बोलत होत्या. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्‍वनाथा, जि.प.सभापती शरद नवले, बाबासाहेब दिघे, मिरा चकोर, विद्यापीठाचे डॉ.किरण कोकाटे, डॉ.आनंद सोळंके आदी उपस्थित होते. अध्यक्षा गुंड पुढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेने शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेतला आहे. याशिवाय जिल्हा परिषद सोलर उर्जेचा वापर करून पाणी योजना चालविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करीत आहे. सेंद्रिय शेतीतील दर्जेदार उत्पादनांचे चांगले मार्केटिंग झाल्यास शेतकर्‍यांना दुहेरी लाभ होणार असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेवून इतरांनाही सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कुलगुरू डॉ.विश्‍वनाथा म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कष्ट करणारे असून ते शेतात नवनवीन प्रयोग स्वत:हून करीत असतात. मागील काही वषारत रासायनिक शेतीमुळे जमिनीच्या क्षमतेवर मोठा दुष्परिणाम झाला आहे. त्यातच दुष्काळासारखे नैसर्गिक संकट आल्यास शेती व्यवसाय अडचणीत येतो. रासायिक कृषीनिविष्ठा अतिशय महागड्या असून त्याचे शेतीवर तसेच शेती उत्पादनावरही दुष्परिणाम होतात. सेंद्रिय शेती केल्यास शेतकर्‍यांचा अनाठायी खर्च वाचणार आहे.
याशिवाय सेंद्रिय शेतीची दर्जेदार उत्पादने आरोग्यासाठीही चांगली असतात. सेेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी कृषी विद्यापीठ, जिल्हा परिषद, कृषी विभाग एकत्रितरित्या प्रयत्न करीत असून शेतकर्‍यांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरूंनी केले. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शरद नवले म्हणाले, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग गेल्या 2 वषारपासून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी चळवळ राबवत आहे. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम हळूहळू समोर येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आताप-सूनच सजग राहण्याची गरज आहे. भविष्यात पारंपरिक सेंद्रिय शेतीच शेतकर्‍यांना तारणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व तंत्रज्ञान मिळवून देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी प्रास्ताविक केले. एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना जैविक खतांचा वापर, विद्यापीठाचे संशोधन, सेंद्रिय खते तयार करण्याची पध्दत, अपारंपरिक उर्जा स्त्रोत याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांनी जैविक खते प्रयोगशाळेसही भेट देवून माहिती घेतली.