भारतातील चार हजाराहून अधिक श्रीमंतानी देश सोडला
नवी दिल्ली, दि. 1 - भारतासारख्या देशातून देखील वर्षाला 4000 व्यक्तींनी देश सोडला आहे हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2015मध्ये भारतातील शहरी भागात राहणार्या 4 हजार जणांनी देश सोडला आहे. स्वत:ची जन्मभूमी सोडण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. स्वत:चा मुळ देश सोडून दुसर्या देशात जाणारे हे नागरिक सर्वाधिक ऑॅस्ट्रेलियाला पसंती देत असल्याचे दिसून येते. आठ हजार परदेशी नागरिकांनी ऑॅस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यापाठोपाठ अमेरिका आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. सात हजार जणांनी अमेरिकेचे तर पाच हजार जणांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतले आहे.
2015 या वर्षात भारतातील अतिश्रीमंत असलेल्या चार हजार जणांनी देश सोडला आहे. जागतिक पातळीवर फ्रान्समधून सर्वाधिक म्हणजे 10 हजार जणांनी देश सोडला आहे. त्यापाठोपाठ चीनमधून 9 हजार नागरिकांनी तर इटलीमधून 6 हजार नागरिकांनी स्वत:चा देश सोडून दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
आशिया खंडातील भारत आणि चीन या देशातील 13 हजार अतिश्रीमंत नागरिकांनी देश सोडला आहे. या अतिश्रीमंत नागरिकांच्या राहणीमाना योग्य देशातील राहणीमानाचा दर्जा नसल्याने त्यांनी देश सोडल्याचे या अहवालात म्हटले आहे. जेव्हा या देशांमधील राहणीमानाचा दर्जा उंचावले तेव्हा ते परत मुळ देशात परत येतील, अशी आशा यात व्यक्त केली आहे. देश सोडणार्यांची सर्वाधिक असलेल्या फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांपासून ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये तणाव आहे. विशेषत: शहरी भागात हा तणाव जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. अर्थात केवळ फ्रान्स नव्हे तर युरोपमधील बेल्जियम, जर्मनी, स्वीडन, बिटन या देशात सुद्धा असा धार्मिक तणाव वाढत असल्याचे दिसून येते. गीसमधील 3 हजार नागरिकांनी तर रशिया, स्पेन आणि बाझीलमधून प्रत्येकी 2 हजार नागरिकांनी देश सोडला आहे.