Breaking News

भाजपशासित राज्यात हिंसाचारात वाढ: राहुल गांधी


दिगबोई, दि.1 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे विकासाची भाषा करतात. मात्र ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता अआहे; त्या त्या राज्यांमध्ये हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; अशी टीका काँगˆेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
आसाममधील विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मोहिमेसाठी गांधी आसाममध्ये आले आहेत. या दौर्‍यात जाहीर सभेत ते बोलत होते.
या निवडणुकीमध्ये दोन विचारधारांमध्ये लढाई आहे. एका बाजूला काँगˆेस आहे आणि दुसर्‍या बाजूला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत; असे सांगून राहुल यावेळी बोलताना म्हणाले की; पंतप्रधान मोदी भˆष्टाचाराच्या विरोधात लढाई लढण्याची भाषा करतात. त्याचवेळी कर्ज बुडवून मद्यस्रˆाट विजय माल्ल्या परदेशात पसार होतात. जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांची अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा होते. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली; याचा खुलासा आपण मागणार आहोत; असे राहुल यांनी यावेळी सांगितले.
सरकारला खरोखरच भˆष्टाचाराला आळा घालायचा असेल; तर त्यांनी ‘फेअर अँड लव्हली’ योजना कशासाठी आणली; असा सवालही त्यांनी केला. काँगˆेस राज्यात सत्तेवर आल्यास गरिबांना 2 रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे; तसेच 100 होतकरू विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.