उत्तराखंडात बहुमत सिद्ध करण्याचा न्यायालयाचा आदेश
डेहराडून,वृत्तसंस्था,दि.29 - उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मगंळवारी,
बहुमत सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला 31 मार्चपर्यंत वेळ दिला आहे. पक्षातील काही बंडखोरांनी भाजपात प्रवेश करण्याचा इशारा दिल्यानंतर येथील सरकार अस्थिर झाले होते. जर बहुमत सिद्ध न केल्याने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती लागवट करण्याचा आदेश भाजपने दिले होते. मात्र, काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतले असता, न्यायालयाने त्यांना 31 मार्च रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यात सांगितले. काँग्रेस पक्षाकडून मोठयाप्रमाणात मोर्चे बांधणी चालू आहे.असून दरम्यान उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे लोकशाहीची हत्या झाली असा आरोप मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केला होता.