बॉम्बस्फोटप्रकरणी 10 जण दोषी, तिघांची सुटका
मुलुंड, घाटकोपरमधील
बॉम्बस्फोटप्रकरणी 10 जण दोषी, तिघांची सुटका
मुंबई,प्रतिनिधी,दि.29- मुलुंड, घाटकोपर येथे डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या वर्षी झालेल्या बाँबस्फोटप्रकरणात मंगळवारी टाडा न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या 10 दोषींना आज बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.तब्बल 13 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे. या स्फोटांमागे सिमीचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
मुंबईतील मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले येथे साखळी स्फोट झाले होते. त्याप्रकरणी आज टाडा कोर्टाने निकाल सुनावत 10 आरोपींना पोटा, शस्त्रास्त्रे कायदा, रेल्वे कायद्याअंतर्गत दोषी ठरवले. तर नदीम पालोबा, हरून लोहार आणि अदनान मुल्ला या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटांनी मुंबईकर हादरले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या इमारतीतील मॅकडोनाल्ड्समध्ये 6 डिसेंबर 2002 रोजी पहिला स्फोट झाला तर 27 जानेवारी 2003 साली विलेपार्ले पूर्वेकडील गजबजलेल्या मार्केटमध्ये दुसरा स्फोट झाला. तिसरा व शेवटचा स्फोट 13 मार्च 2003 रोजी मुलुंड स्थानकातील गर्दीने खचाखच भरलेल्या कर्जत लोकलमध्ये झाला. या तिनही स्फोटांमध्ये 12 जण ठार 27 जण गंभीररित्या जखमी झाले होते, या संदर्भात दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (पोटा कायदा) खटला दाखल करण्यात आला होता.