उपसचिवाला आ.बच्चू कडूंची मारहाण कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
मुंबई
आंदोलनामुळे चर्चेत राहणारे अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंत्रालयामध्ये एका उपसचिवाला मारहाण केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी
मंत्रालयातील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या गावित यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनावेळी मंत्रालयातील तळमजल्यावर सर्व कर्मचारी एकत्र आले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या या कृतीचा कर्मचारी संघटनेकडून निषेध करण्यात आला. गावित यांना विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारा, असे उत्तर आपल्याला दिले.
लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल, तर सामान्य माणसाचे काय, म्हणून आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.